breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी –  महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला आहे.

जाधववाडी, कुदळवाडी येथील 24 मीटर शिवरस्ता व देहू आळंदी रस्त्यालगत 18 मीटर डीपी रोड मधील अनधिकृत बांधकाम भुईसपाट करण्यात आले आहे. असे एकूण 664 चौरस मीटर बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोशी चिखली रोड ते जाधवावडी येथील अंदाजे क्षेत्रफळ 105 चौरस मीटरवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button