breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेची पावसाळापूर्व कामे युध्दपातळीवर सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सद्यस्थितीत कोरोना विषाणू अर्थात कोविड १९ च्या या कठीण काळातही जलनिःसारण विभागाचे अभियंते, कर्मचारी रात्रंदिवस आपल्या सेवेसाठी कार्यरत आहेत. लवकरच पावसाळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जलनिःसारण विभागामार्फत पावसाळापुर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत जलनिःसारण वाहिन्या (Drainage lines) जलनिःसारण चेंबर्स यांची स्वच्छता करणे चालू आहे. या अंतर्गत सदर नलिका व चेंबर्स यांचे चोकअप काढणे, त्यातील कचरा काढणे ही कामे चालू आहेत.

ही स्वच्छतेची तसेच चोकअप काढण्याची कामे वेळेत झाली तर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडणार नाहीत व आपले जीवन सुसह्य राहील.
या पार्श्वभूमीवर सर्व नागरीकांनी जलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच ठेकेदारांच्या कामगारांना सहकार्य करावे.

आपल्या भागातील ड्रेनेज लाईन्स सुस्थितीत राहण्यासाठी तसेच चोकअप होऊ नयेत यासाठी नागरीकांना घरातील कचरा, भाजीपाल्याचा कचरा व इतर टाकाऊ वस्तू रितसर कचराकुंडीत टाकावा किंवा घंटागाडी कर्मचा-यास द्यावा. सदरचा कचरा ड्रेनेज चेंबरमध्ये किंवा उघड्या गटारामध्ये टाकल्यास ते वारंवार चोकअप होऊन पावसाळ्यात पाणी तुंबुन आपल्यालाच त्रास होऊ शकतो. म्हणून, सर्व कचरा कचराकुंडीत टाकण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. नागरीकांनी पावसाचे पाणी ड्रेनेजलाईनला जोडू नये. तसेच नागरीकांनी त्यांच्या घराचे ड्रेनेज महानगरपालिकेच्या ड्रेनेजलाईनला जोडण्यासाठी नियमानुसार अर्ज करून ड्रेनेजलाईनला जोडून घ्यावे. ते परस्पर उघड्या गटाराला अथवा पावसाळी गटाराला जोडू नये.

शहरातील नागरीकांनी उपरोक्तप्रमाणे सुचनांचे पालन करून, पिंपरी चिंचवड शहर सुरक्षित व आरोग्यदायी राखण्यास महानगरपालिकेस सहकार्य करा, असे आवाहन महानगरपालिकेच्या जलनिःसारण विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button