breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचा मिळकतकर भरा, अन्यथा जप्ती कारवाई करु – आयुक्तांचा इशारा

एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 20 हजार नागरिकांना नोटीस

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये अनेक मिळकतधारकांनी मोठ्या प्रमाणावर कर थकवला आहे. एक लाखाच्या वर थकबाकीधारकांना थकबाकीसह मिळकत कर भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर आठ दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास मालमत्ता जप्तीचा इशारा, आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.

शहरात एकूण 5 लाख 25 हजार मिळकतीची नोंद आहे. त्यापैकी एक लाखांवरील मोठ्या थकबाकीधारकांची संख्या 19 हजार 993 इतकी आहे. थेरगाव कर संकलन कार्यालयाकडे सर्वाधिक 3 हजार 949 मोठे थकबाकीदार आहेत. त्यापाठोपाठ चिखली कार्यालयाकडे 3 हजार 338 आणि भोसरी कार्यालयाकडे 1 हजार 898 मोठे थकबाकीदार आहेत. एक हजारपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या कर संकलन कार्यालयाची संख्या 6 असून पाचशेपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या कार्यालयांची संख्या 8 आहे. कमी थकबाकीदार असलेल्या केवळ 2 आहे.

महापालिकेच्या सर्व 16 विभागीय कर संकलन कार्यालयाकडून 1 लाख व त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसांच्या आत त्यांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कर न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कर संकलन विभागाला वसुली मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button