breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका स्थायी समितीकडून विकास कामांसाठी सुमारे 32 कोटी रुपयांची मान्यता

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे 31 कोटी 95 लाख रूपयांच्या खर्चास आज (गुरुवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते.

त्यामध्ये रावेत येथील पंपगृहांतर्गत जलउपसा क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक पंपिंग मशीनची उभारणी करणे. त्या अनुषंगिक कामांसाठी येणाऱ्या 12 कोटी 44 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

तसेच कोरोना विषाणूमुळे (Covid-19) शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या मे व जून 2020 या कालावधीत हाउसकिपिंग कामाकरिता झालेल्या 49 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. क्रीडा विभागास आवश्यक स्काय वॉकर ओपन जिम साहित्य खरेदीकमी येणाऱ्या 95 लाख 63 हजार अशा विविध 31 कोटी 95 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button