breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका सर्वसाधारण सभेत आमदार लांडगेंची ‘तुफान बल्लेबाजी’

  • भोसरी मतदार संघाची राज्यातील ‘रोल मॉडेल’च्या दिशेने वाटचाल
  • मलिटस्पेशालिटी हॉस्पिटल, ललित कला अकादमीला हिरवा कंदील

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी बुधवारी ‘तुफान बल्लेबाजी’  केली.  शहरातील सर्वात मोठे ८५० बेड्सचे शासकीय हॉस्पिटल, केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत ललित कला अकादमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या तुळापूर ग्रामपंचायतीसाठी प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला.

राज्यातील विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून भोसरी विधानसभा मतदार संघाचा विकास केला जाईल, असा शब्द आमदार लांडगे यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविताना दिला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीत (२०१७) शहरवासीयांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर समाविष्ट गावांसह भोसरी मतदार संघाच्या विकासासाठी ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अभियान हाती घेण्यात आले होते. त्यामधील प्रकल्प एक-एक करीत आमदार लांडगे यांनी महापालिका, राज्याशासन आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे.

‘वायसीएम’पेक्षा मोठे शासकीय हॉस्पिटल होणार…

स्व. अण्णासाहेब मगर आणि खासदार शरद पवार यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये पहिले शासकीय रुग्णालय अर्थात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय उभारण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळसह पुणे जिल्ह्यातील उत्तर भागातून येणाऱ्या रुग्णांना ‘संजिवीनी’ मिळाली. त्याच धर्तीवर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पिंपरी-चिंचवडमध्ये आधुनिक सोयी-सुविधायुक्त रुग्णालय उभारण्याचा संकल्प आमदार लांडगे यांनी केला होता. त्यानुसार आता तब्बल ८५० बेड्सचे रुग्णालय साकारले जात आहे.

शिवप्रेमींमधून आमदार लांडगेंच्या निर्णयाचे स्वागत..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी व बलिदान दिनानिमित्त सुविधा पुरवण्याकरीता तुळापूर ग्रामपंचायतीला ५ लाख रुपयांची प्रतिवर्षी मदतनिधी देण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी आमदार लांडगे यांना विचारणा केली होती. तमाम भारतवासीयांच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ  असलेल्या ग्रामपचायत तुळापूरला पुण्यतिथी आणि बलिदान दिनी मदत म्हणून प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचा निधी महापालिका प्रशासन देणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातील शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button