breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका विषय समिती सभापती निवड 14 जूनला, उत्सुकता शिगेला

  • सोमवारी (दि.10) अर्ज दाखल करण्याची मुदत

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विधी, महिला बालकल्याण समिती, शहर सुधारणा, क्रीडा या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी येत्या 14 जून रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर यांनी जाहीर केली आहे.

महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती, क्रीडा समिती, शहर सुधारणा समिती, विधी या विषय समित्यांवर मागील महिन्यामध्ये सदस्यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता सभापतीपदासाठी 14 जूनला निवडणूक होईल. त्यासाठी सोमवारी (दि.10)  दुपारी 3 ते 5 यावेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

त्यानंतर 14 जून रोजी सकाळी अकरा वाजता पिंपरी महापालिकेतूल स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्याचवेळी अर्ज छाननी व उमेदवारांना माघारीसाठी मुदत दिली जाईल. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल काम पाहणार आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button