महापालिका प्रशासनात उलथापालथ , 91 जणांच्या नियतकालिक बदल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/transfer_20170914078.jpg)
- 38 कर्मचा-यांना दिल्या पदोन्नती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाने वार्षिक, नियतकालिक सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासन सेवेच्या दृष्टीने बदली पदस्थापन देण्यात आली आहे. त्यानूसार महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात 2015 मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानूसार पालिकेच्या 91 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि 38 जणांना पदोन्नती देण्यात आली, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील लेखाधिकारी -5, लेखापाल – 7, उपलेखापाल – 6, मुख्य लिपिक – 7, लिपिक – 39, भांडारपाल – 2, सहाय्यक भांडारपाल – 4, सर्व्हेअर – 4, स्थापत्य सहाय्यक – 8, आरेखक – 3, अनुरेखक – 6 अशी एकूण 91 जणांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच कार्यालयीन अधिक्षक – 4, भांडारपाल – 2, मुख्य आरोग्य निरीक्षक 2, मुकादम – 30 अशा एकूण 38 जणांची पदोन्नती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवानगी, नगररचना विभागातील तीन ‘आरेखकां’ची बदली करण्यात आली आहे. चार ‘सर्व्हेअर’च्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आठ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या बदल्या केल्या आहेत. सहा ‘अनुरेखकां’च्या बदल्या केल्या आहेत. नऊ लेखापाल, उपलेखापालांच्या बदल्या केल्या आहेत. सात मुख्य लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. तर, 39 लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. सहा भांडारपाल, सहाय्यक भांडारपालांच्या आणि नऊ लेखाधिकारी व लेखापाल अशा 91 अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली झालेल्या कर्मचा-यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे. रुजू न झाल्यास, बदली आदेशाचा अवमान केल्यास तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्यात येईल. शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.