breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणार, स्थायीची शिफारस

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली आहे. महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतनश्रेणी आयोग लागू झाल्यास येणा-या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे. हा ठराव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यासाठी स्थायीने शिफारस केली आहे.

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचा-यांना सातव्या वेतन श्रेणी लागू करण्याची राज्य शासनाने अधिसूचना काढली. त्यानुसार 30 जानेवारी 2019 रोजी सुधारित वेतनसंरचना लागू झाली. तसेच, 24 जानेवारी 2019 अन्वये सोवानिवृत्त कर्मचा-यांना व कुटुंब निवृत्तीधारकांच्या वेतनात 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना किंवा वेतनश्रेणी लागू करण्यासाठी वरीष्ठ अधिका-यांनी वेतन पूनर्रचना समिती गठीत केली आहे. या समितीअंतर्गत आयुक्तांनी कर्मचा-यांना सातव्या वेतनश्रणी लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पालिका कर्मचारी महासंघाने केली आहे.

महापालिका वेतन पूनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार पालिका अस्थापनेवरील पात्र कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सहावा वेतन आयोग लागू केला. त्याच धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. सुधारित प्रगती योजनेनुसार 3 लाभांची वेतन संरचना लागू ठेवण्यात यावी. महागाई भत्यापोटी केंद्र शासनाचे धोरण यापुढेही कायम ठवावे. घरभाडे भत्ता, पूरक भत्ता, वाहतूक भत्ता, रोख रक्कम हाताळणे भत्ता, एनपीए व इतर लागू आहेत. त्यात राज्य शासनाप्रमाणे वेळोवेळी सुधारणा करण्यात यावी. वाहन भत्ता, धोका भत्ता, धुलाई भत्ता, वैद्यकीय भत्ता, एलएसजीडी, एलजीएस इतर वेतनवाडीबाबत धोरण कायम ठेवण्यात यावे, त्याला स्थायीने मान्यता दिली आहे. सर्वसाधारण सभेने या विषयाला मंजुरी द्यावी, अशी शिफारस स्थायीने केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button