breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांना ‘सर्वपक्षीय सस्नेह निमंत्रण’

  • पिंपरी चिंचवडमधील सर्व पक्षीय कार्यालयांना भेटी देण्याचे निमंत्रण

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर हे भारतीय जनता पार्टी कार्यालयात गेल्याने विरोधकांच्या रडारवर आले आहेत. आयु्क्त आज (बुधवारी) महापालिका मुख्य इमारतीत आलेच नाहीत. घरी थांबवून आणि त्यानंतर आक्टो क्लस्टरवर अधिका-यांच्या बैठका घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजप प्रवक्ते आणि आयुक्त दालनास भाजप कार्यालयाचे नामकरण आंदोलन केले. तसेच यापुढे आयुक्तांना सर्व पक्षीय कार्यालयांना भेटण्याचे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेचे आयुक्त श्रावण हर्डिकर हे एकतर्फी कारभार करीत असल्याचे आरोप अनेकवेळा झाला. आयुक्तांना भाजपचे घरगडी, प्रवक्ते अशा टिकाही झाल्या. त्यावरही आयुक्त हे नेहमी विरोधकांना विश्वासात घेवून काम नसल्याचे दिसून आले. आयुक्तांवर विरोधकांनी केलेल्या टिकेला आयते कोलीत सापडले. त्यावरुन आयुक्तांना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी हे सस्नेह निमंत्रण पाठविले आहे. त्या पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

त्यावर म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आपण भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट दिली. त्याच प्रमाणे आमच्याही कार्यालयास भेट द्यावी, आम्हाला देखील तुम्ही शुभेच्छा द्याव्यात. तसेच त्या पत्रिकेवर राष्ट्रवादी, काॅग्रेस, मनसे आणि शेकापचे पक्ष झेंडे प्रतिमा टाकून सस्नेह निमंत्रण पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त हर्डिकर पुन्हा चर्चेत आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button