महात्मा फुले यांचे विचार आजही आदर्शवत – काशिनाथ नखाते
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/20191128_122903.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनतर्फे चिंचवड येथील कार्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांचे हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले यांचे व्यापक विचाराबद्द्ल माहिती देवून जगाने कितीही प्रगती साधली तरी आजही त्यांचे विचार आदर्शवत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास निंमंत्रक चंद्रकांत कुंभार, महादेव गायकवाड़, बाळू सुतार, मनोज ठाकुर, धनराज चव्हांण, संदिप कुमार, ज्योती तोमर, शिला कोरडे ,नसरींन अन्सारी, अनिता पवार, जोतिराम कांबळे,मंगेश कोकरे, विजया भोसले आदी कामगार बांधव उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले ” महात्मा फुले यानी अत्यंत महत्वाचे असे ज्ञानाधारित शिक्षणासोबत कौशल्यपुर्ण मुल्याधीस्ठित शिक्षणाची ओळख पटवून दिली. कष्टकरी,कामगार ,शोषित ,पिडित कामगारांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले. त्यानी लिहिलेल्या “गुलामगिरी” व “शेतकऱ्याचा आसूड ” या ग्रंथातुन कष्टकरी व शेतक-र्यांचे प्रश्न प्रभावी पणे मांडले.
जागतिकीकरणाच्या काळात औद्योगिक उत्पादन करणारे कारखानदार याना जसा आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे, तसा अधिकार आजही शतक-याला मिळाला नाही त्याना आहे त्याच स्थितीत ठेवण्यात काही लोक धन्यता मानत आहेत, भारतीय कृषीप्रधान व्यवस्था असली तरीही शेती हा केंद्र बिन्दू मानुन कधीच नियोजन झाले नाही. हे अनेक वर्षापुर्वी फुलेंनी सांगितले. मात्र, आजही शेतकरी कर्जात अडकलेला दिसत आहे, त्यावर विचार होणे आवश्यक आहे.
समाज सुधारण्यासाठी केवळ समग्र परिवर्तनाचा आधार हा शिक्षण आहे. शिक्षणाने माणूस बदलतो म्हणून सर्वाना शिक्षणाचा अधिकार मिळावा, त्यानी शिक्षणाची गंगा घरोघरी नेले, अशा क्रांतीसुर्याना केवळ स्मृतिदिन आणि जयंती दिनी आठवण न करता वर्षभर त्यांचे विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु, असे आवाहन नखाते यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जाधव यानी केले. तर सिद्धनाथ देशमुख यांनी आभार मानले.