breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहर भाजपातर्फे स्वच्छता अभियान

पिंपरी । प्रतिनिधी
महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरात आज (दि.२ ऑक्टोबर) स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
दरम्यान, भाजपा शहर कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस विजय फुगे, मोरेश्वर शेडगे, ओबीसी सेलच्या प्रदेश सदस्या विना सोनवलकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button