‘महाईन्यूजचा गणपती’: ‘कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावं’; भाजपा प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी यांचे बाप्पाचरणी साकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/WhatsApp-Image-2020-08-30-at-5.35.00-PM.jpeg)
पिंपरी-चिंचवड|प्रतिनिधी|
महाईन्यूजने साजरा केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे कौतूक करत ‘कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावं’ असं भाजपा पिंपरी-चिंचवडचे प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी यांनी बाप्पाचरणी साकडं घातलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/WhatsApp-Image-2020-08-30-at-5.34.58-PM-1024x576.jpeg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ”महाईन्यूज”ने घेतला आहे. त्यानुसार तुरटीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यालयात बसवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांना गणरायांची आरती करण्याचा मान दिला जात आहे. आज आरती करण्याचा मान भाजपा पिंपरी-चिंचवडचे प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी यांना देण्यात आला. यावेळी कूल एक्वा कंपनीचे संचालक घाडगे, रणवीर फॅसिलिटी मॅनेजमेंटचे संचालक स्वप्निल भांडवलकर हे देखील उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/WhatsApp-Image-2020-08-30-at-5.33.31-PM-1024x462.jpeg)
कोरोना विषाणूच्या महामारीत आपणाला अत्यंत साध्या पध्दतीने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे.दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाईन्यूजने साजरा केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे कौतूकही केले.तसेचं इतर कार्यालयीन कामांबाबत आढावाही घेतला.