मराठा क्रांती मोर्चाचे भर चौकात जोडे मारो आंदोलन
पिंपरी | महाईन्यूज
संभाजीराजे छत्रपती यांना एका मराठी वृत्तवाहिनीवरून अपशब्द वापरल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तिव्र संताप व्यक्त करत एड. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध केला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीवर एड. गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी (दि. 7) संभाजीराजे छत्रपती हे अफजलखानाची औलाद आहेत, मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज दलाल आहे, अशी स्फोटक विधाने केल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सदावर्ते यांच्या विरोधात तिव्र संताप व्यक्त केला आहे. सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवारी (दि. 9) दुपारी बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश काळे यांनी कळविली आहे.