मनसेच्या मागणीला यश, जुनी संगवीतील रुग्णालयात सुविधांची पुर्तता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/IMG-20200302-WA0002.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या मागणीची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुनी सांगवी येथील दवाखान्यात सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. याबाबत मनसेच्या पदाधिका-यांनी पालिकेच्या वैद्यकीय विभागाला अपु-या सुविधांची परिस्थीती कळविली होती.
जुनी सांगवीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्व. इंदिरा गांधी प्रसुतीगृह रूग्णालय असून अडचन नसून खोळंबा” अशी परस्थिती झाली होती. गेल्या दोन महिण्यांपासून पाठपुरावा करत होतो. मनसेच्या वतीने निवेदन दिले होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/IMG-20200302-WA0003.jpg)
निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी डाॅक्टरच्या कमतरतेमुळे रूग्णांची अडचन, हिरकणी कक्ष त्वरित चालू करावे, टी. बी. रूग्णासाठी वेगळा कक्ष असावा, तीन महिण्यांपासून भुलतज्ञ नाहीत, कंटुब नियोजन ॲापरेशनस होणारी अडचन भुलतज्ञ, वाॅडबाॅय, सफाई कर्मचारी देणे, दवाखाना विस्तारीकरण करणे इत्यादी मागणी केली होती. मागणीची पुर्तता न झाल्यास मनसेकडून खळ्ळखट्याकचा इशारा देण्यात आला होता.