breaking-newsपिंपरी / चिंचवड

मनपा कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करा : विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना हिवाळी अधिवेशन सुरु असताना मा.उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे दिनांक २०/१२/२०१९ रोजी सातवा वेतन आयोग लागू करणेबाबतचा आदेश पारीत करण्यात आलेला आहे. सदरचा आयोग लागू करताना राज्य शासनाने काही अटीसह मान्यता देण्यात आली होती.

        नुकतेच नवी मुंबई महापालिकेस याच अटीवर सातवा  वेतन आयोग मंजूर करण्यात आलेला आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस सातवा वेतन आयोग मंजूर होणे आवश्यक आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या विरोधात प्राणपणाने लढत आहेत, त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या मर्यादित राहिली आहे. मनपाचे कर्मचारी कोरोनाच्या युध्दात प्राणपणाने लढत असताना त्यांना प्रोत्साहानपर भत्ता, विमा व वैद्यकीय किट पुरविणे इत्यादीबाबक यापूर्वी मागणी केली होती. आतातरी मनपाच्या कर्मचा-यांना त्यांच्या हक्काचा सातवा वेतन आयोग मिळणे अत्यावश्यक आहे. इतर महानगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे आपल्या मनपाच्या कर्मचा-यांच्या मनोधर्यावर त्याचा परीणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणे गरजेचे आहे.

, नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या पध्दतीने अटीसह सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे, त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचा-यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button