breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

एखाद्या मद्यपी नागरिकांने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. परंतू, पोलिस ठाण्यात दारु पिऊन येत एका पोलिस कर्मचा-याने महिला पोलिसाला शिवीगाळ करीत दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे त्या पोलिस कर्मचा-यावर कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

मारुती हरिभाऊ बढेकर असे धिंगाणा घातलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे. आरोपी व फिर्यादी दोघेही दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री फिर्यादी यांची ठाण्यात अंमलदार म्हणून ड्युटी होती. तर आरोपीला चऱ्होली परिसरात गस्त घालण्याची ड्युटी देण्यात आली होती.

दरम्यान, आरोपी ड्युटीचे नेमून दिलेले ठिकाण सोडून दारू पिऊन पोलिस ठाण्यात आला. फिर्यादीशी बाचाबाची करीत शिविगाळ केली. ‘तुला कोरोना होईल’ असे म्हणत अश्लील शब्द वापरून धिंगाणा घातला. पोलिस ठाण्यात दोन ते तीन तास हा धिंगाणा सुरु होता. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सूरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button