भोसरीत 411 मतदान केंद्र, तर सहा संवेदनशिल केंद्रावर पोलिसाची नजर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/31_03_2019-polling-station_19089469.jpg)
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी 411 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चार लाख 41 हजार 125 मतदार आपला मतदाना हक्क बजावू शकणार आहेत. भोसरीत सहा मतदारसंघ संवेदनशिल जाहीर करण्यात आली आहेत. भोसरी विधानसभेसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
भोसरी मतदारसंघात एक लाख 99 हजार 493 स्त्री आणि दोन लाख 41 हजार 601 पुरुष आणि इतर 53 असे चार लाख 41 हजार 125 मतदार आहेत. 411 मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया पार पडणार असून 411 मतदान यंत्र असणार आहेत. 494 कंट्रोल युनिट, 494 बॅलेट युनिट आणि 535 व्हीव्हीपॅट राखीव म्हणून तयार करण्यात आली आहेत. 2260 कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत.
भोसरीत सहा मतदारसंघ संवेदनशिल जाहीर करण्यात आली आहेत. तर, निगडी यमुनानगरमधील अमृतानंदमयी शाळेत सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, 10 टक्के राखीव कर्मचारी असणार आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहेत.