भोसरीत बाजीप्रभुने खिंड लडवली पण गड हातून निसटल्याची खंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/महेश-लांडगे.jpg)
- महेश दादांनी उपसलेअतोनात कष्ट
- समर्थकांना बसला पराभवाचा धक्का
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राजकीय वैर कायमचे बाजुला ठेवून आमदार महेश लांडगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी अतोनात कष्ट उपसले. आहोरात्र मेहनत करून भोसरीकरांचा कौल मिळवून दिला. तरी, शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. भोसरीच्या बाजीप्रभुने निर्धाराने खिंड लडवली पण शिरूरचा गड शिवाजीरावांच्या हातून निसटल्याचा घाव महेश लांडगे यांच्यासह समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांच्या भावना सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत.
भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात कायमच राजकीय वैर होते. दोघांकडून एकमेकांवर टिकाटिपन्नी केली जात असायची. मात्र, शिरूर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटील यांना विजयी करण्याची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश दादांवर सोपविली होती. मोदींचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांशी असलेले राजकीय वैर बाजुला सारून दादांनी मदतीचा हात पुढे केला होता. लोकसभा निवडणुकीत भोसरीतून मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दादांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो पाळला सुध्दा. महेश दादांनी भोसरीतून आढळरावांना 40 हजारहून अधिक मतांचे लीड मिळवून दिले.
रात्रंदिवस प्रचारात दादांनी सहभाग घेतला. शेकडो कार्यकर्ते, शिवसैनिकांशी समन्वय ठेवून वातावरण निर्मितीवर त्यांनी भर दिला. आहोरात्र कष्ट करूनही आढळरावांना थोडक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याने सर्वांना पराभवाचा धक्का बसला आहे. भोसरीत बाजीप्रभुने खिंड लढवली परंतु, शिरूरचा गड शिवाजीरावांच्या हातून थोडक्यात निसटून गेल्याची खंत सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.