भोसरीत देशी बनावटीचे पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त
पिंपरी ( महा ई न्यूज ) – देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह तरुणाला भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृह गेटच्या समोरुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केली.
रोहन सहदेव पाषणकर (वय २३, रा. नांदे म्हाळुंगे रोड, वाघजाई रोड, सर्व्हे नं.४९/१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अवैधरित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट १ मधील पोलीस शिपाई सचिन मोरे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एका तरुण भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृह गेटच्या समोर पिस्तुल घेऊन उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन रोहनला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे तपास करत आहेत.