breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत डॉक्टरांनी मला भीती दाखविल्याने वयोवृध्दाने केली आत्महत्या

पिंपरी |महाईन्यूज|

थंडी ताप येत असलेल्या वृद्ध रुग्णाला एका डॉक्टरने भीती दाखविली. यामुळे घाबरलेल्या त्या रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ११) पहाटे भोसरी येथे घडली.

शिवाजी मारुती होळकर (वय ६८, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी यांनी राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेतला. शुक्रवारी पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिवाजी यांच्या नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मयत शिवाजी यांच्याजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे त्या चिठ्ठीत त्यांनी “गेल्या आठ दिवसांपासून आपणांस थंडी ताप येत होता. त्यासाठी मी जवळच्या खासगी दवाखान्यात गेलो होतो. तेथील डॉक्टरांनी मला भीती दाखविली. या भीतीपोटी आपण आत्महत्या करत आहोत”, असे शिवाजी होळकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button