भोसरीत किरकोळ कारणास्तव सराईत गुन्हेगाराचा खून
![Murder of an inn criminal for petty reasons in Bhosari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Crime-519x470.jpg)
पिंपरी : भोसरी येथे एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. पवन विष्णू लष्करे अस खून झालेल्या सराईताचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लष्करे याने आरोपी सोन्या जाधवच्या दुचाकीची हेडलाईट सुतळी बॉम्ब लावून फोडली होती. तसेच, अक्षय काळे याला देखील मारहाण केली होती.
याच कारणावरून सराईत गुन्हेगार सोन्या जाधव, अक्षय काळे यांनी आठ जणांच्या टोळक्याने पवन विष्णू लष्करेचा कोयत्याने वार करून खून केला आहे. अक्षय काळे, हर्षल परशुराम जाधव, सोन्या परशुराम जाधव, गणेश शिंदे, साहिल मस्के, राजू दोडमाणे यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन लष्करे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. पवनने सोन्या जाधव याच्या दुचाकीच्या हेडलाईटमध्ये सुतळी बॉम्ब लावून हेडलाईट फोडली होती. यावरून त्यांच्यात वादही झाले होते. तसेच, अक्षय काळे याला देखील पवन लष्करेने मारहाण केली होती. यावरून पवन विरुद्ध सोन्या जाधव, अक्षय काळे अस वातावरण तापले होते.
पवन हा दोघांना मारण्यासाठी मंगळवारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. तिथे , पवन आणि अक्षय , सोन्या यांच्यात वाद झाले. त्यांच्यासोबत आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पवन लष्करे याच्यावर कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना मध्यरात्री घडली असून चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.