भोसरीतून 20 उमेदवारांनी केले 27 अर्ज दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Bhosari.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक विभागाकडे एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या एकूण 20 उमेदवारांनी हे अर्ज भरले आहेत.
महेश लांडगे (भाजप), पूजा महेश लांडगे (भाजप), विलास लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष), दत्तात्रय साने (राष्ट्रवादी कॉंग्रेस/अपक्ष), वहिदा शहेनू शेख (समाजवादी पक्ष/अपक्ष), ज्ञानेश्वर बोराटे (बीआरएसपी), विश्वास गरजमल (जनहीत लोकशाही पार्टी), महेश तांदळे (अपक्ष), डाॅ. मिलींदराजे भोसले (अपक्ष), शहानवाज जब्बार शेख (वंचित बहुजन आघाडी), छाया जगदाळे (अपक्ष), हरेश डोळस (अपक्ष), मारुती पवार (अपक्ष), जालिंदर शिंदे (अपक्ष), विजय आराख (बहूजन मुक्ती पार्टी), भाऊ आडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष), दत्तात्रय कोंडीबा जगताप (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी), विष्णु एकनाथ शेळके (अपक्ष), राजेंद्र पवार (बहुजन समाज पार्टी), राजवीर पवार (हमारी अपनी पार्टी) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरी ते निवडणूक लढतीलच असे नाही. यातील बहुतांश उमेदवार आपली उमेदवारी मागे घेत असतात. अर्ज काढून घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर आहे.