भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना महापालिकेतर्फे अभिवादन
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त नेहरुनगर येथील त्यांच्या पुतळ्यास व मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
नेहरूनगर येथे झालेल्या कार्यक्रमास माजी महापौर हनुमंत भोसले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य राहुल भोसले, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते अमित भोसले, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, आर. एम. भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, आदी मान्यवर उपस्थित होते.