breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप प्रोटोकॉल पाळत नाही, म्हणून मी कार्यक्रमाला जात नाही – खासदार बारणे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या बाबतीत सत्ताधारी भाजपकडून प्रोटोकॉल पाळला जात नाही. म्हणून मी अशा कार्यक्रमाला जात नाही, अशी स्पष्टोक्ती खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

खासदार बारणे म्हणाले की, सरकारच्या विकास कामांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदयांनंतर खासदार येतात. त्यानंतर आमदार येतात. त्यानंतर इतर स्थानिक पदाधिका-यांचा उल्लेख केला जातो. परंतु, सत्ताधारी भाजप जाणुनबुजून प्रोटोकॉल पाळत नाही. त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात की काय, अशी भीती त्यांना वाटत असावी. म्हणूनच ते आम्हाला बोलू देत नाहीत. म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहत नाही.

नागरिकांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज उठविणारे मारुती भापकर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवितात की काय, अशी भीती भाजप पदाधिका-यांना वाटली असावी, म्हणून त्यांनी भापकरांना सकाळपासून नजरकैदेत ठेवले होते, असेही खासदार बारणे म्हणाले.

पार्थ पवारच काय दुसरा कितीही मोठा पवार आला तरी मी घाबरत नाही

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार उमेदवार राहणार असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार म्हणाले, पार्थ पवारच काय दुसरा कितीही मोठा पवार आला तरी मी घाबरत नाही. माझी ओळख जनसामान्यांमध्ये मी केलेल्या कामांवरून झाली आहे. पार्थ पवारला अजित पवार यांचा सुपूत्र म्हणून ओळख करून द्यावी लागेल. तशी मला गरज नाही. कारण मी जनतेमध्ये असतो. पवार घराण्याला राज्यातील सर्वच लोकसभेच्या जागा हव्या आहेत. त्यामुळेच ते मावळ, शिरूर, नगर, बारामतीवर लोकसभा मतदार संघांवर आपली हुमूकत प्रस्तापीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कदापी शक्य नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button