भाजपा पिंपरी विधानसभा क्षेत्राचा अभ्यासवर्ग उत्साहात
![BJP Pimpri Assembly constituency study class in excitement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/भाजप-१.jpg)
माधव भंडारी, विजय पुराणिक, केशव उपाध्याय यांच्यासह विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
पिंपरी | प्रतिनिधी
आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी येथे भाजपा पिंपरी विधानसभा क्षेत्राचा अभ्यासवर्ग पार पडला. भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या अभ्यास वर्गाचे उदघाटन भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पहिल्या सत्राने करण्यात आले. या सत्रात त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि मागील सहा वर्षातील अंत्योदय संबंधीचे भाजपाचे प्रयत्न या विषयावर 45 मिनिटांचे माहिती पर मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले.
या वेळी पिंपरी विधान सभेचे 195 कार्यकर्ते त्याच बरोबर माजी खासदार अमर साबळे, प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, उपमहापौर केशव घोळवे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस बाबु नायर, प्रदेश दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक माऊली थोरात, सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, आदी सर्वजण उपस्थित होते.
यानंतर आपला विचार आणि आपला परिवार हे सत्र संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदजी कुलकर्णी यांनी मांडले. भाजपा महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्ये यांनी ‘राज्यातील राजकीय पार्श्वभुमी, 2014 नंतरचे भारतीय राजकारणातील बदल आणि याबाबतचे आपले दायित्व’ हा विषय अत्यंत सोप्या, सुटसुटीत पद्धतीने मांडुन उपस्थित कार्यकर्त्यांची मने जिंकली. दुपारच्या सत्रात भाजपा माजी प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांचे ‘भाजपचा इतिहास, विकास आणि आपली विचारधारा’ या विषयावरील सत्र घेण्यात आले. ‘सोशल मिडीयाचा उपयोग आणि त्याचा वापर’ या विषयावरील सत्र सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने चंद्रभुषण जोशी यांनी घेतले. कार्यकर्ते आणि चंद्रभुषण जोशी यांच्यातील प्रश्नोत्तरांनी हे सत्र अत्यंत खेळीमेळीचे झाले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी ‘पक्षाची संघटनात्मक कार्यपद्धती’ या विषयांवरील समारोपाचे सत्र भाजपा प्रदेश संघटन सरचिटणीस विजयजी पुराणीक यांनी मांडले. अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या विषयावरील हे सत्र त्यांनी तितक्याच प्रभावीपणे मांडले. त्यामुळे संपुर्ण दिवसभर चाललेल्या या अभ्यास वर्गाचा समारोप प्रभावी आणि कार्यकर्त्यांच्या हृदयाला भिडणारा झाला. समारोप नंतर विजयजी पुराणीक यांनी कार्यकर्ते यांच्या सोबत चहापान केले. त्यानंतर अभ्यास वर्गाची समाप्ती झाली.
अभ्यास वर्गाचे संपुर्ण संयोजन पिंपरी विधानसभेचे प्रमुख भाजपा जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे यांनी केले होते. सुरुवातीच्या सत्रांचे सुत्रसंचलन भाजपा जिल्हा चिटणीस देवदत्त लांडे यांनी केले. तर दुसऱ्या सत्राचे सुत्रसंचलन चिंचवड प्राधिकरण मंडलाचे अध्यक्ष विजय शिनकर यांनी केले. अभ्यास वर्गाचे आभार भाजपा स्विकृत सदस्य संजय कणसे यांनी मानले.