भाजपाचे शैलाताई मोळक, अनुप मोरे यांच्याकडे प्रदेश पातळीवरील जबाबदारी!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Molak.jpg)
प्रदेश भाजपाचा संघटनात्मक बांधणीवर भर
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या शैलाताई मोळक यांची भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी अनुप मोरे यांची निवड झाली आहे.
युवती विभागाच्या सह संयोजिकापदी वैशाली खाड्ये यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानस सभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा महाराष्ट्र संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या सूचनेनुसार आगामी काळासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिका-यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहेत.
दरम्यान, सोशल मिडीया संयोजकपदी समर कामतेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कामतेकर यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती भाजपच्या प्रदेश पातळीवरील बड्या पदाधिका-यांनी सांगितली.