breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त

दुषित, अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणा-या पाण्यामुळे नागरिक हैराण

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराला भाजपच्या सत्तेत मागील दीड वर्षापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात मुबलक पाणीसाठा असूनही भाजप पदाधिका-यांच्या दुर्लक्ष आणि अधिका-यांच्या योग्य नियोजनाअभावी शहरवासियांना यातना सहन कराव्या लागत आहे. सध्यस्थितीत दिवसाआड पाणी पुरवठा होवूनही दुषित, अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणा-या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मंगळवारी (दि. 22) दुपारी चार वाजता स्थायी समिती सभागृहात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. बोपखेल, दिघी, च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, तळवडे, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे निलख, वाकड, किवळे, मामूर्डी या गावांतील नागरिकांना पाणी प्रश्न तीव्रतेने भेडसावत होता. त्यावर उपाय योजना करण्यासाठी व समन्याय पद्धतीने पाणी वितरण करण्यासाठी दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्याची अंमलबजावणी पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. तरीही तक्रारी वाढत असल्याने त्या सोडविण्याची मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारची बैठक आयोजित केली आहे.

पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी धरणातून नदी पात्रात पाणी सोडले जाते. नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. तेथून वीस पंपाद्वारे पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. सध्या महापालिका दररोज 480 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा करते. दररोज तीस दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून विकत घेते. म्हणजेच दररोज 510 दशलक्ष लिटर पाणी शहरासाठी वापरले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी यामुळे पाणी कमी पडत असल्याचे चित्र आहे.

शहराची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भामा आसखेड व आंद्रा धरणातून 268 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा राज्य सरकारकडून काही वर्षांपूर्वीच मंजूर आहे. त्यासाठी तीनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र चिखली येथे उभारण्यात येणार आहे. त्यातील शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचे काम सुरू आहे. मात्र, ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. शिवाय, निगडी प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही वाढवावी लागणार आहे, त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तुर्त शहरातील सध्याच्या स्थितीत मार्ग काढावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button