breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या पारदर्शक कारभारात पंधरा वर्षापुढील 85 झाडांची कत्तल

– झाडे तोडल्यानंतरही आयुक्तांची चिडीचुप भूमिका 

– माजी महापाैर मंगला कदम यांचा आरोप 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर आरक्षण क्रमांक 132 या जागेवरील बस टर्मिनल्स जागेवरील दहा ते पंधरा वर्षापुढील तब्बल 85 झाडे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी तोडली आहेत. ही झाडे तोडण्यास उद्यान विभागातील अधिका-यांनीही परवानगी दिली. त्यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी चिडीचुप भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजप पारदर्शक कारभारात भविष्यात बस टर्मिनल्सवरील वृक्षारोपण झाडे तोडल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका व माजी महापाैर मंगला कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.  यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे, प्रशांत शितोळे आदी उपस्थितीत होते.  

कदम म्हणाल्या की,  स्थानिक नगरसेवक तुषार हिंगे यांनी फरगडे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शिवशाहू उद्यानासमोरील मोकळी जागा आरक्षण क्रमांक 132 वर तीन दिवसासाठी खाद्य महोत्सवासाठी जागा भाड्याने घेतली होती. त्यावर आयुक्तांना तक्रारही केली होती. त्याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले. त्या भुखंडावरील दहा ते पंधरा वर्षापुढील पुर्ण वाढ झालेले झाडे तोडण्यात आलेली आहेत. यामध्ये आंबा, पिंपळ, बाबुळ, जांभुळ, कडुलिंब, उंबर या देशी जातींची तोडली आहेत. महापालिकेला तीन हजार 270 रुपये उत्पन्न मिळाले. पण संबंधितांनी पर्यावरणाचे किती नुकसान केले आहे.

महापालिका दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाडे लावण्यासाठी करते. तीच झाडे महापालिकेने पुर्ण वाढ झाल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या नगरसदस्याच्या दबावाखाली बिनधास्त काढुन टाकते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ही झाडे तोडण्यास नगरसेवकांसह महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर देखील तितकेच जबाबदार आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button