breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या निवडणुकीसाठी आयुक्त फंड गोळा करताहेत – शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांचा गंभीर आरोप

बांधकाम प्रकल्पासाठी पाणी पुरवठ्यांची एनआेसी कधी बंद तर कधी सुरु,

भाजप नेत्यांच्या घरचे आयुक्त घरगडी,  अधिका-यांचा मनमानी कारभार 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  वाकडसह परिसरात नवीन बांधकाम प्रकल्पामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पवना धरणात मुबलक पाणी साठा असताना एेन पावसाळ्यात सत्ताधारी भाजप स्थायी समितीने वाकडसह परिसरात बांधकाम प्रकल्पांना एनआेसी देणे बंद केले होते. त्यानंतर सत्ताधारी व विरोधात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्या परिसरात पाणी टंचाईची सध्यस्थिती कायम असताना केवळ भाजपला निवडणुकीत फंड गोळा करुन देण्यासाठी आयुक्तांच्या सांगण्यावरुन पाणी पुरवठा अधिका-यांनी नवीन बांधकाम प्रकल्पांना ना हरकत दाखल (एनआेसी) दाखला देण्यात येवू लागला आहे. दरम्यान, हे दाखले एकाच दिवसात देवून पुन्हा एनआेसी न देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना सत्ताधारी भाजप नेत्यांचे नक्कीच घरगडी झाल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

चिंचवड विधानसभा मतदार संघातील पाणी टंचाई जाणवू लागल्याने पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागात काहीकाळासाठी गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव स्थायी समिती सभेत ऐनवेळी घेतला. त्यावेळी स्थायी समितीने त्या भागात नवीन प्रकल्पामुळे नागरिकांनी कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यावर बांधकाम विभागाने पाणी पुरवठ्याचा सध्यस्थिती अहवाल मागितला होता. तो अहवाल आयुक्तांना पाणी पुरवठा विभागाने सादर केला होता.  सध्यस्थितीत बांधकाम प्रकल्पांना पाण्याची काहीच अडचण नसल्याचे त्यात म्हटले होते. तरीही बांधकामाना एनआेसी देणे बंद केले होते. 

दरम्यान, महापालिका पाणी पुरवठा विभागाने गुरुवारी (दि.4) अचानक दहा बिल्डरांना पाणी पुरवठा एनआेसी दिल्या आहेत. तसेच त्या एनआेसी केवळ एका दिवसात देवून पुन्हा एनआेसी देणे बंद केले. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या सांगण्यावरुन पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी काही बिल्डरांना हाताशी धरुन एनआेसी दिलेल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त हे भाजप नेत्यांच्या तालावर नाचत, त्यांचे घरगडी असल्यासारखे वागू लागले आहेत. सत्ताधारी सांगतील तेव्हा एनआेसी सुरु अनं बंद असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी आयुक्त हे भाजपला मदत करीत असल्याचा आरोपही कलाटे यांनी केला आहे. 

 

महापाैरांना पाण्याचे नाही गांर्भिय

वाकड परिसरात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना मुबलक व पुरेशे पाणी मिळावे म्हणून अमृत योजनेतून दोन टाक्या नव्याने बांधण्यात येणार आहेत. त्या टाक्याचे भूमिपुजन करण्यासाठी महापाैर राहूल जाधव यांना पत्र दिले आहे. परंतू, शहराचे प्रथम नागरिक असलेले महापाैर हे पक्षीय राजकारण करु लागले असून त्यांनी अद्यापही त्या पत्राला उत्तर दिलेले नाही. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापाैरांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या पाणी टंचाई दुर होण्यासाठी पाण्याच्या टाक्याचे भूमिपुजन करण्यात यावे, असेही राहूल कलाटे यांनी सांगितले.   

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button