breaking-newsपिंपरी / चिंचवड

भाजपची महिला कार्यकारणी जाहीर, कुंदा भिसे यांच्यावर चिंचवड विधानसभेची जबाबदारी

  • समाजकार्याच्या बदल्यात भाजपकडून मिळाली पावती
  • चिंचवड विधानसभेसाठी भिसे कुंटुंब उतरणार मैदानात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील सामाजिक कार्यकर्त्या कुंदा भिसे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपविली आहे. भाजप महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षापदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस पदाचीही धुरा देण्यात आली आहे. ही पदनियुक्ती म्हणजे भिसे यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची पावती मानली जात आहे.

शहरातील भाजपच्या महिला मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अनेक पदाधिका-यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. मात्र, कुंदा भिसे यांचे प्रभावी नेतृत्व पाहून त्यांच्याकडे भाजपने दोन वेगवेगळ्या पदांचे कामकाज सोपविले आहे. कुंदा भिसे यांचे पती संजय भिसे यांनी पिंपळे सौदागर येथून सामाजिक कार्याला सुरुवात केली. नंतर ही जबाबदारी त्यांनी कुंदा भिसे यांच्यावर सोपविली. त्यांनी पिंपळे सौदागरसह शहरात आणि शहराबाहेर अलौकीक असे समाजकार्य केले. त्यातून त्यांची अनोखी ओळख तयार झाल्याने याची दखल राजकीय क्षेत्रात देखील घेतली गेली.

संजय भिसे हे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनी केलेले समाजकार्य घराघरात पोहोचले आहे. लोकांचे प्रश्न सोडविणे, अडीअडचणीच्या काळात लोकांच्यासोबत उभे राहणे, त्यांना मदतीचा हात देणे, सामाजिक उपक्रम घेऊन त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविणे, अशी दखल घेण्याजोगी कामे केल्यामुळे सामाजिक क्षेत्रात संजय भिसे आणि कुंदा भिसे या पती-पत्नींची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. असंख्य महिलांचे संघटन करण्याचे कौशल्य कुंदा भिसे यांच्याकडे असल्यामुळे भाजपने त्यांच्यावर दोन पदांची जबाबदारी दिली आहे.

अशी आहे भाजपची नवीन कार्यकारिणी

सोनम मोरे यांची पिंपरी-चिंचवड शहराच्या सरचिटणीस पदी निवड झाली. उपाध्यक्षपदी सरिता नेवाळे व रंजना चिंचवडे यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी अस्मिता भालेकर यांची निवड झाली. चिटणीसपदी निकिता गोसावी यांची निवड झाली. ओबीसी महिला आघाडी अध्यक्षापदी सारिका पवार यांची निवड झाली. तर, सांस्कृतिक महिला आघाडी अध्यक्षापदी नंदा फुगे यांची निवड झाली. त्यांची नियुक्ती जाहीर करताना महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा उज्ज्वला गावडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे आदी उपस्थित होते. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button