breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजप निषेधाच्या घोषणा देत पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पूरग्रस्त नागरिकांचा घेराव

पुणे | महाईन्यूज |प्रतिनिधी |

अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत येथे संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप केला. टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

अरणेश्वर चौकात संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सकाळीच आंदोलनाचा पवित्रा घेत रस्ता अडवला होता. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना बाजूला केले आणि रस्ता खुला केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणच्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. या वेळी संतप्त नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवित त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button