breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भटक्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया ; महापालिकेचा वर्षभरात ५३ लाखांचा खर्च

पिंपरी ( महा ई न्यूज ) –   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 डिसेंबर 2017 ते 20 नोव्हेंबर 2018 पर्यंतच्या  एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 14 हजार मोकाट व भटकी कुत्री पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल 53 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याच कामासाठी 3 महिन्यांसाठी आणखी 25 लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने गुरुवारी (दि.22) मंजुरी दिली आहे.  

सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. सध्या हे काम उदगीर येथील सोसायटी फॉर दि प्रिव्हेंशन ऑफ कु्रएल्टी टू अ‍ॅनिमल्स आणि नवी मुंबईची अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन ही एजन्सी करीत आहे. या दोन एजन्सीची मुदत 14 नोव्हेंबरला संपली आहे. नवीन निविदा प्रक्रिया अर्धवट आहे. त्यामुळे त्याना 15 नोव्हेंबरपासून पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी कामास 3 महिने मुदतवाढीचा प्रस्ताव समितीसमोर होता.  प्रति नर किंवा मादी कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वीप्रमाणे 693 रुपये दर मंजूर केला आहे. या कालावधीत एकूण 3 हजार 600 कुत्र्यांवरील शस्त्रक्रियेसाठी 25 लाख  खर्चास स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली.

त्या विषयावरून सभेत चर्चा झाली. शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे वर्षभरात 14 हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. त्यावर सदस्यांनी शंका उपस्थित केली. शस्त्रक्रिया न करताच कुत्री सोडून दिली जातात. शस्त्रक्रिया करूनही कुत्र्यांना पिले होतात. शहरातील कुत्र्यांची संख्या आटोक्यात येत नाही. तक्रारी वाढतच आहेत, असे मुद्दे सदस्यांनी उपस्थित केले.

त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांनी खुलासा केला. शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रत्येक कुत्र्याच्या कानावर इंग्रजी ‘एल’ आकाराची खूण केली जाते. प्रत्येक कुत्र्याचे छायाचित्र घेतले जाते. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र, मोकाट कुत्र्यांच्या कानावर तशी खूण दिसत नाही, असा सवाल केला.

डॉ. दगडे यांनी सांगितले की, डिसेंबर 2017 ते आतापर्यंत एकूण 14 हजार मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असून, आतापर्यंत 38 लाख रूपये खर्चपोटी अदा केले गेले आहेत. अजून 15 लाख रूपये देणे बाकी आहे. सदर दोन संस्थांना पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ दिली असून, प्रत्येक महिन्यास 1 हजार 200 प्रमाणे एकूण 3 हजार 600 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्टे आहे. त्यासाठी पालिका 25 लाख रूपये खर्च करणार आहे. त्यास समितीने मंजुरी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button