बालेवाडी वसतिगृहात पाचशे क्वॉरनटाईन बेड्सची व्यवस्था; पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ‘एक पाॅझिटिव्ह’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-commissioner.jpg)
शहरात 11 रुग्ण “पाॅझिटिव्ह”, ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीला
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरात आज (बुधवारी) आणखी एक पाॅझिटिव्ह आढळला असून 92 व्यक्तींच्या घशातील द्रव्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीला पाठविले आहेत. दरम्यान, परदेशातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस बालेवाडीच्या वसतीगृहांमध्ये ५०० क्वॉरनटाईन बेड्सची व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयामधून आज (मंगळवारी दि.१८) पर्यंत एकुण ९२ व्यक्तींचे करोना (कोविड १९) घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीला पाठविले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह तर चार व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधील करोना (कोविड १९) या आजाराच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर दोन्ही रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना घरी सोडले तरीही त्यांना घरात क्वॉरनटाईन करण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये करोना पॉझिटीव्ह आढळलेला रग्ण हा फिलिपिन्स येथुन प्रवास करुन पुणे शहरात आलेला आहे. त्यांच्या सहवासितांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच एकुण १२ व्यक्तींचे करोना (कोविड १९) घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
बालेवाडी येथील वसतीगृहांमध्ये ५०० क्वॉरनटाईन बेड्सची व्यवस्था सुरु करण्यात येत आहे. करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी महापालिकेकडून सर्व नागरिकांना आवाहन करुन अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. असे सांगण्यात येत आहे.
चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरांमध्येच (Home Quarantine) राहण्यासाठी मनपाचे वतीने पुनश्च: आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनो… हेल्पलाईन कार्यान्वित
पिंपरी चिंचवड मनपामार्फत हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित करोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.