बालेवाडीत सॉफ्टवेअर कंपनीला भीषण आग, तांत्रिक नुकसान
![The fire started in Mumbai and surrounding cities, with fires raging in three places overnight](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/fire-4_20170914687.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
बालेवाडी येथे एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सोफ्टवेअर कंपनीला आग लागली. यात कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी तांत्रिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ही घटना आज रविवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी चौकात एक बहुमजली व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास कंपनीच्या अर्ध्या भागात आग लागली. रविवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे कंपनीत कोणी अडकल्याची माहिती अदयाप मिळाली नाही. आगीमुळे प्रचंड धूर झाला. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
खासगी टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. प्रचंड धूर झाल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी आल्या. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पार्किंगपर्यंत धुराचे लोट पसरले होते. जवानांनी श्वसन यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.