breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बारामतीतून गोपीचंद पडळकरांना भाजपची उमेदवारी जाहीर

पुणे |महाईन्यूज|

धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर आणि आमदार काशिराम पावरा यांनी आज भाजपत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे सहा आमदार आज भाजपत दाखल होणार असल्याची माध्यमांत चर्चा सुरु होती. पण केवळ दोघांनीच आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी येत्या दोन दिवसांत आणखी एक मेगाभरती होणार असल्याचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले. त्यामुळे संभाव्य आमदारांपैकी काही आमदार भाजपत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल यांना भाजपत आणण्याचा प्रयत्न सुरु असून ते लवकरच पक्षात येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच आज पटेल यांचे समर्थक पावरा यांचा भाजप प्रवेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना बारामतीतून लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button