बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, हा माझा शब्द : अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/71597223_2358720714366245_8774679212918308864_n.jpg)
- हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने उमेदवारी अर्ज भरला
- बारामतीत कार्यकर्ते, हितचिंतकांचे जोरदार शक्तीपदर्शन
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीप्रेमी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की,
‘‘बारामतीकरांनी, पुन्हा एकदा प्रचंड संख्येनं उपस्थित राहून माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. मी कधीही या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा शब्द आहे!’’
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी ‘एकच वादा अजित दादा…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तत्पूर्वी, अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना सौ. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचे औक्षण केले.