breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बांधकाम कामगारांना मिळणार आरोग्य योजनेचा लाभ

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यामुळे राज्यासह इतर राज्यातील कामगारांनाही दिड लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत याचा शुभारंभ आज वाकड येथील “अक्रोपॉलिस” या साईटवर आरोग्य शिबाराचे आयोजन करून करण्यात आले.
बांधकाम कामगार सेनेच्या वतीने वाकड येथील मिलिनीयम डेव्हलपर्सच्या “अक्रोपॉलिस” या बांधकाम साईटवरील नोंदीत कामगारांसाठी आरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले मिलिनीयम डेव्होलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुकरेजा यांच्या शुभहस्ते शिबाराचे उदघाटन करण्यात आले यावेळी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे, आरोग्य योजनेचे जिल्हा समनवयक वैभव गायकवाड सेनेचे उपाध्यक्ष किशोर हातागळे, सरचिटणीस सचिन गुंजाळ, दिपक म्हेत्रे व प्रोजेक्ट मॅनेजर गोविंद कुमार हे उपस्थित होते, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या सहाय्याने लोकमान्य हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल व औधं जिल्हा रुग्णालयाने पुढाकार घेतला. यावेळी दिवसभरात लहान बालक, महिला व पुरुष कामगार अशा २७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना खुप महत्वाची असल्याने बांधकाम कामगार सेनेने वारंवार कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता, साल २०१५ पासुन सुरू असलेली विमा योजना रिनिवलचा वार्षिक हप्ता न भरल्यामुळे बंद करण्यात आली होती तेव्हा पासुन कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता, कामगार मंडळाने आता एखाद्या विशिष्ट कंपनीला करोडो रुपयाचा प्रीमियम न भरता तीच योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ करून राज्यातील व परप्रांतीय नोंदीत कामगारांना दिड लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येणार आहेत, पुर्वी कागदपत्राच्या अभावामुळे या योजनेचा लाभ अनेक कामगारांना घेता येत नव्हता पण आता मंडळाकडील ओळखपत्रावर सुद्धा उपचार होणार आहेत त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे अशी माहिती सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी दिली.
यावेळी लोकमान्य हॉस्पिटलचे सर्जन डॉ. निलेश आगवेकर, सहदेव गोळे, राजु वायकर, रविंद्र गुरव, योगेश ढंगारे, स्टार हॉस्पिटलच्या डॉ. वर्षा पाटील, रोहित लांडगे, माही चव्हाण, विभा सोनकांबळे, जया कांबळे आदींनी शिबिरात सहभाग घेतला.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button