फ्लेक्सच्या श्रेयवादावरुन चर्चेत आलेल्या कासारवाडी दवाखान्याचे महापाैरांनी केले उद्घाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.२० मधील कासारवाडी दवाखान्याचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांत सुरू असलेल्या श्रेयवादामुळे हा दवाखाना बहुचर्चित आला होता.
या कार्यक्रमास ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत-धर, स्विकृत सदस्य माऊली थोरात, कुणाल लांडगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैदयकीय अधिकारी के.अनिल रॉय, डॉ.वैभव सावळे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता केशवकुमार फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने २०१३ साली हा दवाखाना बंद केला होता. कासारवाडीतील नागरिकांच्या आरोग्य सोय व्हावी म्हणून महापालिकेचा दवाखाना तब्बल ७ वर्षांनी सुरू करण्यात आला आहे. हा दवाखाना येथील नागरिकांच्या सेवेकरिता अत्यंत उपयुक्त असणार आहे. परंतू या दवाखाना कुणी सुरु करण्यास कुणी पाठपुरावा केला. तसेच त्याच्या उद्घाटनावरून चांगलेच नाट्य गेल्या काही दिवसांपासून कासारवाडीत रंगले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे विरूध्द भाजपाचे प्रभाग स्विकृत सदस्य कुणाल लांडगे यांच्यात श्रेयवाद रंगला होता. कासारवाडी परिसरात या दोन्ही सदस्यांकडून याचे श्रेय घेण्यासाठी फलकबाजीतून चढाओढ लागलेली पहायला मिळली. त्यामुळे या दवाखान्याचे उद्घाटन कासारवाडीत बहुचर्चित ठरले होते. मात्र, नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न मिटल्याने हा दवाखाना सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.