फेसबुक फ्रेंडला घरी बोलावून तिच्यावर केले अत्याचार
![Unnatural atrocities on an eleven-year-old boy in Alandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime-2.jpg)
पुणे |महाईन्यूज|
फेसबुक फ्रेंडला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिचे अश्लिल फोटो काढून ते व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पंकज रामनाथ उदावंत (वय ३७, रा़ साई चौक, मांजरी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी बारामती येथील एका ३४ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला उदावंत याने एप्रिल २०१८ मध्ये फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख करुन घेतली. ओळखीनंतर त्याने तिला पुण्यात भेटायला बोलावले. पुण्यात आल्यावर तिला त्याने आपल्या बहिणीच्या घरी नेले. तेथे कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुण्यात गणपती पाहण्यासाठी ही तरुणी आली असताना आरोपीकडे ती मुक्कामाला होती. तेव्हा त्याने तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध केला. त्याचे अश्लिल फोटो काढले. हे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लिल फोटो उदावंत याने तिचा भाऊ व ओळखीच्या एका जणाला पाठवले. त्यानंतर या तरुणीने बारामती पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ बारामती पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला असून पोलिसांनी उदावंत याला अटक केली आहे.