Breaking-newsपिंपरी / चिंचवड

फेरीवाला कायद्यांची जनजागृती, ‘यशदा’मध्ये राज्यव्यापी फेरीवाला कार्यशाळा

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

फेरीवाला कायद्यांची अमंलबजावणी करण्यासाठी राज्यातील फेरीवाला संघटनाची राज्यभर बैठका घेण्यात येणार आहेत. त्याकरिता पुण्यातील यशदा संस्थेत नॅशनल हाॅकर्स फेडरेशन इंडिया, महाराष्ट्र हाॅकर्स फेडरेशन यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

या बैठकीस मुख्य समन्वयक मैकंजी ड़ाबरे, कामगार नेते नितिन पवार, प्रदेश सरचिटणीस काशिनाथ नखाते, जम्मू आनंद, अविनाश मधाळे, विनिता बाळेकंद्री, हिरामण पगार, युवा सेंटरचे राजु वंजारे, अखिलेश गौड़, चंदन कुमार, शांता खोत, एल.एम.डांगे, सुरेश टेंगळे, लक्ष्मण निकम, शांन्ताराम मातेले,अमित पद्माकर यांच्यासह राज्यभरातून विविध जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी राज्यभरातील आलेल्या सर्व कार्यकर्त्यानी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील विविध महानगरपालिका शहर फेरीवाला समितीचे कामकाज, अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. मैकंजी ड़ाबरे यानी सर्वोच्च न्यायालयाने देशभारातील फेरीवालाच्या बाजूने दिलेल्या निकालाबाबत माहिती देण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणून कायद्यांची योग्य अमंलबजावणी करता येईल.

तसेच जम्मू आनंद यांनी कायद्यातील सर्व मुद्दे समजावून सांगितले. कायदा नीट समजून न घेतल्यास होणार-या परिणाम विषद केले. तर नखाते यानी राज्यात बैठका घेण्याकरिता फेरीवाला घटकाला न्याय देण्यासाठी नगरविकास विभाग, प्रत्येक मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करावी, कायद्यांच्या अमंलबजावणीसाठी प्रयत्न करावे. असेही आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button