Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांची बदली
![Pimpri Chinchwad Navnagar Development Authority merger notification issued!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/PCNTDA.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांची आज बुधवारी (दि. 21) बदली झाली आहे. कोल्हापूर विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव यांची याठिकाणी वर्णी लागणार आहे.
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी खडके यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात चांगले काम करण्यावर भर दिला. राज्य सरकारच्या नगरसविका विभागाने खडके यांची आज बदली केली. त्यांच्या जागी कोल्हापूर विभागाच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव येणार आहेत. खडके यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.