प्रभाग क्रमांक 18 मुख्य चौकातील अतिक्रमण हटवा
![Remove the encroachment at Ward No. 18 Main Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/सुरेश-भोईर.jpg)
प्रभाग सभापती सुरेश शिवाजी भोईर यांचे अधिकारी व प्रशासन यांना सुचना
पिंपरी | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 18 मुख्य चौकात अतिक्रमनाचा विळखा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्याची दाखल घेत ब क्षेत्रीय समितीचे सभापती सुरेश शिवाजी भोईर यांनी पाहणी केली. तसेच हि अतिक्रमणे हटविण्याची सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिली.
पिंपरी चिंचवड शहरात अतिक्रमणचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. शहरातील मुख्य चौकात व्यापारी, हातगाडी व फेरीवाले बसत असतात. त्यांच्यामुळे चौकात अतिक्रमण होत आहे. महापालिका प्रशासन देखील या कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
चिंचवडगाव, लिंक रोड, चाफेकर चौक, तसेच चाफेकर चौकातील पुलाखाली घोडे व इतर साहित्य न वापरातील पार्किंगच्या गाड्या, हातगाड्या, मोरया हॉस्पिटल चौक, काकडे पार्क चौक, पोद्दार शाळा चौक, प्रभागातील अन्य ठिकाणी *हातगाडी पथारी वाल्यांची अतिक्रमणे जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे रहदारी व नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी ब प्रभाग समितीचे सभापती सुरेश भोईर यांच्याकडे आल्या. त्यानुसार सभापती सुरेश शिवाजी भोईर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत या चौकांची पाहणी केली. या पाहणी वेळी प्रभाग अधिकारी प्रशांत जोशी, तसेच प्रशासन अधिकारी सोनम देशमुख, अतिक्रमण अधिकारी हनुमंत सरवदे सर्वांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.