पिंपरी / चिंचवड
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या शहराध्यक्षपदी अनिता तुतारे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190721-WA0007.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी अनिता तुतारे यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष गजानन दशरथ चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. संस्थेचा विस्तार करीत संस्थेचे धेय धोरणे जन सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, निखिल येवले, सागर पाचर्णे, उषा आल्हाट, अनुपमा उंब्रजकर उपस्थित होते.