breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पोलिसांचा मनाई आदेश असताना आमदार महेश लांडगे यांचे ‘सेलिब्रेशन’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्री राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा आज दिमाखात पार पडला. या सुवर्णक्षणाचा योग साधून भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शहरामध्ये 10 लाख लाडू वाटपाची तयारी केली. पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाचा मनाई आदेश असताना आमदार लांडगे यांनी शहरात ठिकठिकाणी लाडू वाटप करून श्री राम मंदिर भूमीपूजन सोहळा साजरा केला.

अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमीपूजनाची आज केंद्र सरकारने तयारी केली होती. हा योग साधून आमदार महेश लांडगे यांनी शहरात 10 लाख लाडू वाटपाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी दहा लाख लाडू वाटपाचे नियोजन केले. अशातच पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने हा सोहळा साजरा करण्यासाठी सक्त मनाई आदेश काढला. यासंबंधीत त्यांना नोटीस बजावून हा सोहळा साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला. मात्र, आमदार लांडगे यांनी पोलीस प्रशासनाचा हा आदेश बाजुला सारून श्री राम भक्तांच्या मनातील भावना व्यतिथ व्हाव्यात, यासाठी शहरात ठिकठिकाणी लाडू वाटप करून सोहळा साजरा केला.

आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी, नगरसेवकांनी तसेच नागरिकांनी भरभरून कौतुक केले. हिंदु धर्मियांचे स्वप्न आज साकार झाल्याची प्रचिती येत असल्याची भावना अनेकांनी आमदार लांडगे यांच्याकडे बोलून दाखविली. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पाडण्यात आला. नागरिकांनी ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

भाजपच्या सर्वच पदाधिका-यांचा सोहळ्यात सहभाग

भोसरी येथील विठ्ठल मंदिरात आमदार लांडगे यांनी पूजन केले. मोरवाडी येथील भाजपच्या पक्षकार्यालयासमोर श्री रामाची मूर्ती पूजन करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकमेकांना लाडू भरवून हा सोहळा साजरा केला. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगसेवक मोरेश्वर शेडगे यांनी देखील एकमेकांना लाडू भरविले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button