breaking-newsपिंपरी / चिंचवड
पोलिसांचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ‘वॉच’
![Pakistani drones again in Kashmir; Threw weapons, explosives and chemicals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/drone.jpg)
पिंपरी- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जारी दिले आहेत. नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस शहरात प्रथमच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ‘वॉच’ ठेवणार आहेत.
काही ठिकाणी नागरिक गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. बंदी असूनही दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार (दि. २२) पासून शहरावर ‘ड्रोन कॅमेरा’ घिरट्या घालणार आहे. याचे थेट प्रक्षेपण स्थानिक पोलीस ठाण्यात होणार आहे. यामध्ये एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आल्यास पोलीस तत्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणार आहेत. असे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले.