‘पैस करंडक’ खुली राज्यस्तरीय मूकनाट्य स्पर्धेत कलापिनी ग्रुप प्रथम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/72045580.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
थिएटर वर्कशॉप कंपनी आयोजित ‘पैस करंडक’ खुली राज्यस्तरीय एकपात्री आणि मूकनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडली. चिंचवडच्या ‘पैस’ रंगमंचावर ही स्पर्धा पार पडली. सांघिक मूकनाट्य स्पर्धेत तळेगाव दाभाडेतील कलापिनी ग्रुप प्रथम क्रमांक विजेता ठरला, तर एकपात्री स्पर्धेच्या लहान गटात सान्वी भाके आणि मोठ्या गटात चैतन्य सातभाई विजेते ठरले. एकपात्री स्पर्धा आणि मूकनाट्य स्पर्धेसाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक, पुणे येथून कलाकारांनी सहभाग घेतला होता.
एकपात्री स्पर्धा लहान आणि मोठा अशा दोन गटांत पार पडली. एकपात्री स्पर्धेत लहान गटात सावनी दात्ये (द्वितीय) आणि श्रावणी मेस्त्री (तृतीय) विजेत्या ठरल्या. पार्थ फडणीस, कल्याणी पानस्कर, राधा बेलसरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आणि सुयश सावंतने विशेष उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. एकपात्री स्पर्धेच्या मोठ्या गटात सीमा शेरकर (द्वितीय) आणि ऋचिका भोंडवे (तृतीय) विजेते ठरले. कौस्तुभ शाळीग्राम, राहुल शेलार, सुमंत शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
सांघिक मुकनाट्य स्पर्धेत रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक, तर नादब्रह्म (एमआयटी) संस्थेने तृतीय क्रमांक मिळवला. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयास उत्तेजनार्थ, नवरसम् नाट्यसंस्थेने विशेष उत्तेजनार्थ; तसेच रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय यांना लेखनाचे पारितोषिक मिळाले. कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने भरवलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून कलाकारांचा प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे, उद्योजक दत्तात्रय गव्हाणे, चित्रपट संकलक बी. महांतेश्वर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण रंगकर्मी किरण येवलेकर, समीर कालमित्रा यांनी केले. प्रभाकर पवार यांनी प्रास्ताविक केले. सचिन बहिरगोंडे, बाळकृष्ण पवार यांनी रंगमंचव्यवस्था केली. रश्मी घाटपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका राजे यांनी आभार मानले.