breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘पे अॅण्ड पार्क’ धोरण नागरिकांवर लादल्याप्रकरणी महापाैर, स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा

रिपब्लिकन युवा मोर्चां पिंपरी चिंचवड शहर पदाधिका-यांची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यास सत्ताधारी भाजपला अपयश येत आहे. त्यातच ‘पे अॅण्ड पार्क’ धोरणाला मंजुरी देवून एकप्रकारे जनतेच्या लुटमारीला चालना दिली आहे. हा निर्णय घेणा-या महापालिकेचे महापाैर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल उबाळे यांनी केली. 

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी (दि.22) झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘पे अॅण्ड पार्क’ धोरणाला मंजूरी दिली. या निर्णयाच्या निषेधार्थ रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदोलन केले. तसेच  ‘पे अॅण्ड पार्क’ हे धोरण रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपचे महापाैर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी शहरातील जनतेवर ‘पे अॅण्ड पार्क’ धोरण लादला आहे. त्यामुळे जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे जनतेच्या हिता विरोधी निर्णय घेणा-या महापाैर, स्थायी समिती सभापतींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाकडून अजय ठोंबरे, भारत मिरपगारे, संगिता शहा, लक्ष्मीबाई शेलार, अजय लोंढे, वामन कांबळे, शिवशंकर उबाळे, भिमराव तुरुकमारे, प्रमोद शिंदे, राजू गोरे, विजय गायकवाड, रोहित नंदिरे, सिद्दीकीभाई शेख यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button