पूजा चव्हाण प्रकरणात कोणीही मध्यस्ती करणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
!['Pune Lock' from 6 pm to 6 am; Important decision of Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/ajit-pawar-2-1.jpg)
मुंबई / महाईन्यूज
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. आम्ही तपासात कोणतीही मध्यस्थी करत नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
याप्रकरणी अरुण राठोडला ताब्यात घेतलं का ? असं विचालं असता पवार म्हणाले, “पोलिसांकडे चौकशी जोरात सुरु आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला तर त्यात राजकीय हस्तक्षेप होतो, अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे”.
अजित पवार यांनी यावेळी वनमंत्री संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला. “संजय राठोड गायब आहेत कोणी सांगितलं ? आजच माझं यशोमती ठाकूर, संजय राठोड, बच्चू कडू यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, हे मी त्यांच्या कानावर घातलं आहे. राज्याच्या प्रमुखांनी निर्णय घेतला तर त्यांना तो समजलाच पाहिजे. सहकारी असल्याने त्यांना विश्वासात घेणं, माहिती देणं महत्वाचं असतं,” असं अजित पवार म्हणाले.