पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये वाऱ्यासह पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ
![Presence of rain with wind in Pune and Pimpri-Chinchwad; Cable of citizens](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pune-rains-807_202008475951.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणाची स्थिती उद्भवणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने मंगळवारीचं वर्तवली होती. दरम्यान आज दुपारनंतर पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमधील विविध भागात वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट पावासाने हजेरी लावली आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. येत्या शुक्रवार (ता. १९) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशाराही दिला आहे. मात्र, पावसाने पुणे शहरात गुरवारीच हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह पुण्यात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. तसेच शहरात दुपारपर्यंत ऊन जाणवत होते. मात्र, चार नंतर वातावरण बदलू लागले. सोसाट्याचा वारा सुटल्याने हवेत मोठ्याप्रमाणात धूळ पसरली. यामुळे रस्त्यावरील स्पष्ट दिसत नव्हते. हवेत गारवा निर्माण झाला. सायंकाळी सहाला विजाही कडाडाटासह पावसाळा सुरुवात झाली.
अचानक बदललेल्या वातावरणामुळे अनेकांची धांदल उडाली. सायंकाळची वेळ असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. छत्री, रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजावे लागले. तर काहींनी पावसापासून बचाव करण्यासाठी पूल, झाडांचा आसरा घेतला. वाहन चालविताना समोरील स्पष्ट दिसत नसल्याने वाहन रस्त्याकडेला उभे केल्याचे दिसून येत होते. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये ठिकठिकाणी दुचाकीचालक थांबले होते यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.