breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये सहा लाख बालकांना देणार पोलिओ डोस

पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या हेतू, पोलिओ लसीकरण मोहीम १९ जानेवारीला

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या आदेशानुसार येत्या १९ जानेवारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे सहा लाख बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. पोलिओच्या डोसमुळे बालकांना आजारापासून मुक्ती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य़ अधिकारी डॉ. भगवान पवार, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.

देशात १९९८मध्ये पोलिओचे ४,३१६ रुग्ण आढळून आले. त्यानंतर २०११नंतर पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पुणे जिल्ह्यात १९९९नंतर पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. अफगाणिस्तान व पाकिस्तान या शेजारील देशामध्ये तुरळक स्वरूपात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी देशात अद्याप पोलिओ लसीकरण आवश्यक आहे.

पुणे शहर जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्रात येत्या १९ जानेवारीला शून्य ते पाच या वयातील ५ लाख ६८ हजार ८३० बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या बालकांना ३,९५१ बुथवर पल्स पोलिओ लस देण्यात येईल. प्रत्येक बुथवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात ४ लाख ८९ जार ७७०, तर पुणे शहरात ७९ हजार ६० बालकांचा समावेश आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी एसटी बसस्थानके, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा, धार्मिक स्थळे, प्रवासातील लाभार्थी, खासगी दवाखाने या ठिकाणी बूथ ट्रान्झिट टीम व मोबाइल टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button